डाळिंब उत्पादनासाठी सांगोला जिल्हा जगभरात प्रसिद्ध होता. मात्र डाळिंब पिकावरील वाढत्या रोग राई मुळे डाळिंब बागा उध्वस्त होऊ लागल्या आहेत.यामुळे डाळींबाची शेती करणे शेतकऱ्याला अवघड झाले आहे.
सांगोल्यातील डाळिंबाला जगभरातून मागणी होती. तर सांगोल्याचे डाळिंब हे थेट युरोपच्या बाजारात विकली जात होते.यामुळे येथील शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आली होती. आता मात्र स्थिती बदलली असून नैसर्गिक बदलामुळे डाळिंबाच्या बागा सांभाळणे जिकरीचे काम झाले आहे.
तेल्या, कधी मर, कधी कुजवं आणि आता पिन होल बोअर अर्थात खोडकिडीमुळे डाळिंब बागा उध्वस्त होऊ लागल्या आहेत. तर यामध्ये सांगोला जिल्ह्यातील एकूण 50 हजार एकरावरील डाळिंब बाग निम्म्यापेक्षा जास्त खोडकीड रोगामुळे जळून गेल्या आहेत.
यामुळेच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता थेट बागांवर ट्रॅक्टर चालवण्यास सुरुवात केला आहे. तर यापूर्वीच्या तुलनेत केवळ २० टक्केच बागा उरल्या आहेत. या तालुक्यात डाळींबाची उलाढाल ही जवळपास 4 हजार कोटीवर गेली होती.
आता मात्र 500 कोटी रुपयांवर आली आहे. म्हणून डाळिंब शेतीला बगल देत शेतकरी येथील शेतकरी आंबा, पेरू, केळी अशा फळबागांकडे वळू लागले आहेत.