Polyhouse Farming : भारतात अलीकडे शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे शेतीचा व्यवसाय हा मोठा प्रॉफिटेबल बनला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीमधून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे.
सध्या भारतात संरक्षित शेती करण्याला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. यासाठी पॉलीहाऊस किंवा ग्रीन हाऊसचा उपयोग होत आहे. पॉलिहाऊस किंवा ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी ही शेतीसाठी एक वरदान आहे.
यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा उत्पादनावर कुठलाच परिणाम होत नाही. यामुळे, कोणतेही नैसर्गिक संकट आले तरी देखील चांगले उत्पादन मिळवता येते. दरम्यान आज आपण ग्रीन हाऊस किंवा पॉलिहाऊस मध्ये कोणकोणत्या पिकांची लागवड करता येणे शक्य आहे.
ग्रीन हाऊस मध्ये कोणत्या पिकांची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
पॉलिहाऊस मध्ये कोणत्या पिकांची लागवड करता येते
फुल पिके : पॉलिहाऊस मध्ये किंवा ग्रीन हाऊस मध्ये प्रामुख्याने दांड्यांच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. शेवंती सारख्या फुलांचे यामध्ये उत्पादन घेतले जाऊ शकते. पॉलिहाऊस मध्ये फुल पीक लागवड करून चांगली कमाई करता येणे शक्य आहे.
भाजीपाला पिके : भाजीपाल्यातून जर चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर पॉलिहाऊस मध्ये भाजीपाल्याची लागवड करावी असा सल्ला तज्ञ देतात. पॉलिहाऊस मध्ये हिरवी आणि रंगीत ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारले अशा विविध भाजीपाल्यांची लागवड करता येणे शक्य आहे.
कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी इत्यादी पालेभाज्यांची लागवड करता येणे शक्य आहे. ब्रोकोली, झूकिनी, लेट्यूस, लिक अशा विविध विदेशी भाजीपाल्यांची लागवड करता येणे शक्य आहे.
औषधी वनस्पती : हळद, आले, मिंट अशा औषधी वनस्पतींची देखील लागवड करता येणे शक्य आहे.
फळ पिके : स्ट्रॉबेरी, टरबूज, डाळिंब, द्राक्ष, केळी अशा विविध फळ पिकांची लागवड यामध्ये करता येणे शक्य आहे.