माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग केव्हा सुरू होणार ? पीएमआरडीएने थेट तारीखच सांगितली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMRDA Metro Line : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी मोठे प्रयत्न झाले आहेत. दळणवळण व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो मार्ग विकसित केले जात आहेत. पुण्यातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर आत्तापर्यंत मेट्रो सुरू झाली आहे.

मेट्रो सुरु झाल्यापासून पुणेकरांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित झाला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. विशेष म्हणजे पुणेकरांनी मेट्रोला भरभरून असा प्रतिसाद दिला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आजमितीस महामेट्रोने विकसित केलेले मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू आहे. खरंतर महामेट्रोने पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी पर्यंतच्या मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे.

या दोन मेट्रो मार्गाचे सुरुवातीचे टप्पे प्रवाशांसाठी सुरू झाले आहेत. उर्वरित टप्प्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या काही महिन्यात हे संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत सुरू केला जाणार आहे.

तसेच रुबी हौल क्लिनिक ते रामवाडी हा टप्पा एप्रिल 2024 पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. महा मेट्रो व्यतिरिक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून देखील शहरात मेट्रो सुरू केली जाणार आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून माण-हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

या मेट्रो मार्गाला पुणेरी मेट्रो म्हणून ओळखले जात आहे. दरम्यान पीएमआरडीएच्या या मेट्रोमार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर हिंजवडी हे एक आयटी हब आहे.

या ठिकाणी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून म्हणजेच शिवाजीनगर येथून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त येत असतात. यामुळे या मेट्रो मार्गाचा शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे.

दरम्यान या मेट्रोमार्गाचे आतापर्यंत 45 टक्के एवढे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे उर्वरित काम देखील जलद गतीने सुरु असून हा मेट्रो मार्ग लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरू करण्याचे नियोजन पीएमआरडीएने आखले आहे.

या मेट्रो मार्गाची लांबी 23.203 किलोमीटर एवढी आहे. यासाठी 8313 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर म्हणजेच पीपीपी तत्त्वावर पूर्ण केला जात आहे.

या प्रकल्पाचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा प्रकल्प मार्च 2025 पर्यंत पुणेकरांसाठी सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. अर्थातच मार्च 2025 पर्यंत या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे येत्या दोन वर्षात पुणेकरांना पुणेरी मेट्रोचा लाभ मिळेल असे चित्र तयार होत आहे.