Pm Surya Ghar Yojana : केंद्र शासनाने सर्वसामान्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांसाठी केंद्र शासनाने पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची माहिती सर्वप्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनात समोर आली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या योजनेची माहिती दिली.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत देशातील एक करोड कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत. यातून सर्वसामान्य गरजवंत नागरिकांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान देखील पुरवले जाणार आहे.
या अंतर्गत सर्वसामान्यांना 75% पर्यंतची सबसिडी मिळणार आहे. परंतु या योजनेच्या माध्यमातून दोन किलो वॅट पेक्षा अधिक क्षमतेचे सोलर पॅनल बसवले तर अनुदानाची रक्कम काहीशी कमी होत जाणार आहे. दरम्यान आता आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
याअंतर्गत किती किलोवॅट सोलर पॅनल साठी ग्राहकांना किती खर्च करावा लागू शकतो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.योजनेचा लाभ घेण्यासाठी, ग्राहक https://pmsuryaghar.gov.in/ या पोर्टलवर अर्ज करून नोंदणी करू शकतात. या वेबसाईटवर केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे.
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन घ्यावे लागेल. यानंतर तुम्हाला रूफटॉप सोलर पॅनल साठी अर्ज करायचा आहे.अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. मग DISCOM कडून व्यवहार्यता मंजुरीची प्रतीक्षा करा. एकदा तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळाल्यावर तुमच्या डिस्कॉममधील नोंदणीकृत विक्रेत्यांद्वारे प्लांट स्थापित करावा लागेल.
फक्त नोंदणीकृत विक्रेत्याद्वारे प्लांट स्थापित केला तरच तुम्हाला अनुदान मिळणार आहे. एकदा प्लांट स्थापित झाला की लगेचच याची डिटेल तुम्हाला वेबसाईटवर द्यावी लागणार आहे आणि मग लगेचच नेट मीटरसाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. एकदा नेट मीटर इन्स्टॉल झाले की त्यानंतर DISCOM कडून याचे इन्स्पेक्शन पूर्ण केले जाणार आहे.
एकदा की इन्स्पेक्शन पूर्ण झाले की लगेचच कमिशनिंग सर्टिफिकेट जारी केले जाणार आहे. कमिशनिंग रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची डिटेल आणि एक रद्द झालेला चेक अपलोड करावा लागणार आहे. यानंतर मग तीस दिवसांच्या आत अनुदानाचा पैसा तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
सोलर पॅनलसाठी किती खर्च करावा लागणार?
एक किलोवॅट पॅनेल बसवण्यासाठी 60 हजार रुपये खर्च येतो. दोन किलोवॅटपर्यंतच्या ग्राहकांसाठी 75 टक्के सवलत आहे. ग्राहकांकडे तीन किलोवॅट मीटर असल्यास, त्यांना सौर पॅनेल बसविण्यावर ६० टक्के अनुदान मिळेल. 4 ते 10 किलोवॅटच्या मीटरसाठी अनुदान अनुक्रमें 45, 36, 30, 26, 23, 20, 18 टक्के एवढे राहणार आहे.
याबाबत माहिती देताना केस्कोचे व्यवस्थापकीय संचालक सॅम्युअल पॉल एन म्हणाले की, एक आणि दोन किलोवॅटच्या पॅनल्सवर अनुदान सर्वाधिक आहे. ग्राहकाचे वीज कनेक्शन जास्त लोड असले तरी तो दोन किलोवॅटपर्यंतचे पॅनेल बसवू शकतो.
एका किलोवॅटसाठी 60 हजार रुपये खर्च करण्याऐवजी केवळ 15 हजार रुपये आणि दोन किलोवॅटच्या कनेक्शनसाठी 1.20 लाख रुपयाऐवजी केवळ 30 हजार रुपये मोजावे लागतील. तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दिले जाणारे अनुदान थेट खात्यावर मिळणार आहे.