पीएम कुसुम योजना : 9,690 रुपये भरून शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 93 हजार रुपयांचा सौर कृषी पंप ! अर्ज कसा करायचा? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kusum Yojana : भारत हा शेतीप्रधान देश आहे. कारण की देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व शेती पूरक व्यवसायांवर आधारित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत म्हणजेच जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. हेच कारण आहे की कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत.

खरंतर भारत शेतीप्रधान देश आहे पण आज देखील आपल्या देशात शेतकऱ्यांना शाश्वत वीज कनेक्शन उपलब्ध नाही. अनेक भागात शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन नसल्याने त्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई करता येत नाही. दरम्यान शेतकऱ्यांचे हेच टेन्शन दूर करण्यासाठी आणि त्यांना शाश्वत विजेचे कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबवली जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जात आहे. या पीएम कुसुम सोलार योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन एचपी पासून ते साडेसात एचपी पर्यंतचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. हे कृषी पंप शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होत आहेत. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के एवढी रक्कम भरून आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के एवढी रक्कम भरून सौर कृषी पंप दिला जात आहे.

अर्थात सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर आणि एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप दिला जात आहे. ही योजना ज्या शेतकऱ्यांना अद्याप विजेचे कनेक्शन नाही त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर ठरत आहे.

या योजनेचा महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या चालू आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्रात एक लाख सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र राज्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे.

एकट्या बीड जिल्ह्यातून या योजनेसाठी आतापर्यंत एक लाख 40 हजार हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत आज आपण या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र राहणार, यासाठी किती अनुदान मिळणार आणि अर्ज कसा करावा लागणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि निकष

पीएम कुसुम योजनेसाठी फक्त पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसलेले शेतकरी पात्र राहणार आहेत. अर्थातच ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासूनच पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध आहे त्यांना या अंतर्गत लाभ मिळणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.

म्हणजे ज्यांच्याकडे शेततळे, विहीर, बोअरवेल, नदीजवळ शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे असेच शेतकरी यासाठी पात्र राहणार आहेत. शिवाय अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही शासकीय योजनेतून सौर कृषी पंप मिळवलेले नाही तेच शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.

किती अनुदान मिळत

3 एचपीच्या सौर कृषी पंपची किंमत 1,93,803 रुपये आहे. यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी हिस्सा 19,380 रुपये एवढा आहे आणि एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा 9,690 रुपये आहे. म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तीन एचपीच्या पंपासाठी एक लाख 74 हजार 423 रुपये आणि एससी/एसटी शेतकऱ्यांना एक लाख 84 हजार 113 रुपय अनुदान मिळणार आहे.

5 एचपी पंपसाठी 2,69,746 रुपये किंमत ठरवण्यात आली असून यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% म्हणजे 26,975 रुपये भरावे लागणार आहेत आणि एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याना 5% म्हणजे 13,488 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे पाच एचपी च्या पंपासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना दोन लाख 42 हजार 771 आणि एससी/एसटी शेतकऱ्यांना दोन लाख 56 हजार 258 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. 

7.5 एचपी पंपची एकूण किंमत 3,74,402 रुपये ठेवण्यात आली असून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के म्हणजेच 37,440 रुपये रक्कम भरावी लागणार आहे आणि एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के म्हणजे 18,720 रुपये रक्कम भरावी लागणार आहे. याचाच अर्थ साडेसात एचपीच्या पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तीन लाख 36 हजार 962 रुपये आणि एससी/एसटी शेतकऱ्यांना तीन लाख 55 हजार 682 इतकं अनुदान मिळणार आहे.

अर्ज कुठे करणार

या योजनेसाठी शेतकऱ्यांना महाऊर्जेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. महाऊर्जेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर उजवीकडे महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी हा पर्याय दिसेल. या ऑप्शनवर शेतकऱ्यांना क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर या योजनेसाठीचा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करायची आहेत.