Pm Kisan Yojana : भारत हा शेतीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित असल्याने आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. देशाची जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर आधारित आहे.
अशा स्थितीत देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.
हे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 14 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. 14वा हप्ता जुलै महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मागील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून आता या हफ्त्याची रक्कम मिळून जवळपास एका महिन्याचा काळ उलटला आहे. खरं तर या योजनेचा हप्ता हा दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जातो.
त्यामुळे आता 15वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार की दिवाळीनंतर हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी इथं नमूद करू इच्छितो की या योजनेचा मागील हफ्ता म्हणजे 14 वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या साडेआठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान वर्ग करण्यात आला होता.
आता या योजनेच्या पुढील हप्ता केव्हा जमा होऊ शकतो याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या योजनेचा पुढील हप्ता हा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात पीएम किसानचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जर दिवाळीपूर्वी मोदी सरकारने पी एम किसानचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना दिला तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पण जर नोव्हेंबर महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो असे देखील सांगितले जात आहे.