Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा लाभ कोणाला मिळत नाही ? वाचा महत्वपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. म्हणजेच या योजनेला आता जवळपास पाच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या पाच वर्षाच्या काळात या योजनेची लोकप्रियता खूपच वाढलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात या योजनेची सुरुवात केली आणि तेव्हापासूनच ही योजना सुपरहिट ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे मिळतात.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते देऊ करण्यात आले आहेत. 15 हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. आता सर्वांना या योजनेच्या 16 व्या हप्त्याचे वेध लागले आहे. योजनेचा सोळावा हप्ता केव्हा जमा होणार हाच सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.

दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 16 वा हप्ता हा फेब्रुवारी 2024 किंवा मार्च 2024 अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. खरे तर ही योजना सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

तथापि, या योजनेबाबत अजूनही शेतकऱ्यांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांना या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळत नाही असाही प्रश्न सतावत आहे. यामुळे आज आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेणार आहोत.

या योजनेचा लाभ हा केवळ भारतीय शेतकऱ्यांना मिळतो.

ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

जर कोणी डॉक्टर, अभियंता, सीए अशा व्यवसायात असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

याशिवाय, जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही.

जे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही.

लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार; विधानसभा, विधान परिषदेतील आमदार यांना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही.

एका शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. म्हणजे जर पती आणि पत्नी दोघांच्या नावावर जमीन असेल तर फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळेल.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा