Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. तेव्हापासून ही योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.
या अंतर्गत दिले जाणारे सहा हजार रुपये एकूण तीन टप्प्यात शेतकऱ्यांना दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण होत आहे. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातोय.
आतापर्यंत एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मागील सोळावा हप्ता हा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला.
महाराष्ट्रातील यवतमाळ येथून या योजनेचा सोळावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांचे सारे लक्ष आगामी सतराव्या हफ्त्याकडे आहे. याचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार ? यासंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
केव्हा जमा होणार पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा सोळावा हफ्ता हा देशभरातील नऊ कोटीहुन अधिक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. दरम्यान आता या योजनेचा सतरावा हप्ता हा लोकसभा निवडणुका झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी आशा आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरम्यान 19 एप्रिल ला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून चार जून 2024 ला लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्थातच नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठी मदत होणार आहे.