Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी स्कीम आहे. ही सरकारी स्कीम देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. या योजनेचा लाभ सर्वच राज्यांमधील शेतकरी घेत आहेत. यामुळे ही योजना संपूर्ण देशात लोकप्रिय बनली आहे.
या योजनेची लाभार्थी संख्या जगात असे अनेक देश आहेत ज्यापेक्षा अधिक आहे. शासकीय आकडेवारीनुसार, सध्या स्थितीला या योजनेचा साडेआठ कोटीपेक्षा अधिक शेतकरी लाभ घेत आहेत. ही योजना वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी नसून शेतकरी कुटुंबासाठी आहे.
त्यामुळे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच सदस्याला घेता येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. हे सहा हजार रुपये मात्र शेतकऱ्यांना एक रक्कमी मिळत नाहीत.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होते. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे एका वर्षात तीन हप्ते दिले जातात. आतापर्यंत 16 हफ्ते पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.
म्हणजेच ज्या शेतकऱ्याला या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ मिळालेला असेल त्याला आतापर्यंत 32 हजार रुपये मिळालेले असतील. या योजनेचा सोळावा हफ्ता हा गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्या राज्यातील यवतमाळ येथे आयोजित एका कार्यक्रमातून वितरित करण्यात आला होता.
विशेष म्हणजे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेचा देखील दुसरा आणि तिसरा हप्ता या हफ्त्यासोबतच वितरित करण्यात आला होता.
17 वा हफ्ता केव्हा जमा होणार ?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सतरावा हप्ता केव्हा जमा होणार ? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे सध्या आचारसहिता सुरू आहे. यामुळे शासनाला हा हफ्ता आचारसंहिता काळात किंवा निवडणूक होईपर्यंत वितरित करता येणे शक्य नाही.
परिणामी या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 17 वा हप्ता हा जेव्हा नवीन सरकार स्थापित होईल तेव्हाच जारी होण्याची शक्यता आहे. अर्थातच नवीन सरकारच पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे.
तथापि याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण, लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच या योजनेचा हप्ता जमा होणार आहे. लोकसभेची निवडणूक ही सात टप्प्यात होणार असून 19 एप्रिल पासून याची सुरुवात होणार आहे.
तसेच लोकसभेचा निकाल हा चार जूनला लागणार आहे. अर्थातच पीएम किसानचा 17 वा हप्ता हा चार जून नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.