Pm Kisan Yojana : 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी पीएम किसान योजनेची घोषणा करण्यात आली होती. आता ही योजना सुरू होऊन पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी देखील सुरू होणार आहे.
खरेतर गेल्या लोकसभेच्या पूर्वी सुरु झालेली मोदी सरकारची ही योजना शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनली आहे. या योजनेचे करोडो लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वाटप होत असते.
विशेष बाब अशी की, या योजनेअंतर्गत दिला जाणारा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होत आहे. आतापर्यंत या योजनेचे एकूण 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एका शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत जवळपास 30,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळाला आहे.
विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांचे सारे लक्ष या योजनेच्या पुढील हप्त्याकडे आहे. मोदीचे दोन हजार रुपये केव्हा जमा होणार हा प्रश्न आता गाव-खेड्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विचारला जात आहे.
दरम्यान आज आपण मोदी सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांशी योजनेचा पुढील सोळावा हप्ता केव्हा जमा होऊ शकतो याबाबत शासनाकडून कोणती अपडेट समोर येत आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केव्हा जमा होणार 16 वा हफ्ता ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेचा बारावा हप्ता हा ऑक्टोबर 2022 मध्ये जमा करण्यात आला होता. त्यानंतर तेरावा हप्ता हा फेब्रुवारी 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 27 जुलै 2023 ला पुढील 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
दरम्यान, मागील पंधरावा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. अशातच आता सोळावा हप्ता केव्हा जमा होणार याची देखील माहिती समोर येऊ लागली आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार सध्या केंद्र शासनाकडून पी एम किसान योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी एक विशेष मोहीम राबवली जात आहे. यांतर्गत या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे केवायसी, लँड सिडींग, आधार सिडींग केले जात आहे.
यामुळे या योजनेचा पुढील सोळावा हफ्ता हा या महिन्याच्या अखेरीस अर्थातच फेब्रुवारीच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तसेच जर फेब्रुवारीच्या अखेरीस हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.
खरेतर मार्चमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू होणार असे बोलले जात आहे. त्यामुळे आचार संहिता लागू होण्यापूर्वीच आगामी 16वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.