Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 च्या निवडणुकीपूर्वी झाली होती. म्हणजे आता या योजनेला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 17 हप्ते वितरित झाले आहेत. 17 वा हप्ता काल अर्थातच 18 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे आयोजित शेतकरी परिषदेमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरे तर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असा दावा केला जात होता. यानुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि नवीन सरकार केंद्रात आल्यानंतर लगेचच या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आला आहे.
तथापि या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाला असला तरी देखील अनेकांना या योजनेचा हप्ता मिळालेला नसल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण जर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर त्यांनी कुठे तक्रार केली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पैसे खात्यात आले की नाही हे चेक करा
केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सुद्धा देशभरातील शेतकऱ्यांसाठी शेकडो योजना सुरू केल्या आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजना हे देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता शेतकऱ्यांना मिळतो.
नुकताच अर्थातच 18 जूनला या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असेल. आता आपण पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे की नाही हे कसे चेक करायचे हे पाहणार आहोत.
यासाठी तुम्हाला याच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Farmers Corner या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर बेनिफिशयरी लिस्ट वर क्लिक करावे लागणार आहे.
मग राज्य जिल्हा तालुका आणि तुमचे गाव निवडावे लागणार आहे. यानंतर मग गेट रिपोर्ट वर क्लिक करावे लागणार आहे. येथे तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. जर तुमच्या खात्यात पीएम किसानचा सतरावा हफ्ता जमा झालेला नसेल तर तुम्ही यां अधिकृत वेबसाईटवर तक्रार सुद्धा दाखल करू शकता.
वेबसाईटवर तक्रार कशी करायची
यासाठी अधिकृत वेबसाईटवर असणाऱ्या हेल्प डेस्क या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर द्यावा लागणार आहे. त्यानंतर डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला क्वेरीचा अर्ज दिसणार आहे. यात तुम्हाला आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल नंबर द्यायचा आहे आणि समस्या काय आहे ते नमूद करून तो अर्ज सबमिट करायचा आहे.
या नंबर वरही तक्रार करता येणार
पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 0120-6025109, 011-24300606 वर किंवा 155261 या नंबर वर देखील तक्रार करता येणार आहे. याशिवाय या योजनेच्या लाभार्थ्यांना pmkisan- [email protected] या अधिकृत ईमेल आयडी वर मेल देखील करता येणार आहे. तक्रार दाखल केल्यानंतर तुमच्या तक्रारीवर कारवाई केली जाईल आणि यानंतर तुम्हाला या योजनेचा पैसा मिळणार आहे.