Pm Kisan Yojana : सध्या संपूर्ण देशभर अवकाळी पावसाचे सत्र पाहायला मिळत आहे. यामुळे दुष्काळाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आधीच मोठे नुकसान झाले आहे आणि आता वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आणखी आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी निवडणुकीच्या गडबडीतच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्युज समोर आली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही बातमी कामाची राहणार आहे.
कारण की पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली.
तेव्हापासून ही योजना अखंडितपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात सहा हजार रुपये दिले जात आहेत. परंतु हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. तर टप्प्याटप्प्याने या योजनेच्या पैशांचे वितरण केले जाते.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे हे पैसे दिले जातात. प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जात आहे. आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 16 हप्ते मिळालेले आहेत.
मागील 16 वा हप्ता हा यवतमाळ येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या योजनेचा सतरावा हप्ता हा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असा दावा केला जातोय.
मीडिया रिपोर्ट नुसार, या योजनेचा पुढील सतरावा हप्ता मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. दुसरीकडे काही अन्य मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा पुढील हप्ता हा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पीएम किसानचा हप्ता प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. मागील सोळावा हफ्ता फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केला होता.
यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील सोळावा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ एका क्लिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ग केला होता.
याचा लाभ 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला होता. या अंतर्गत 21,000 कोटी रुपये दिले गेले होते. आता या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सतरावा हप्ता हा मे महिन्यात किंवा जून महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.