Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जाते.
एका आर्थिक वर्षात तीन हप्ते दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांचा खात्यावर जमा झाले असून मागील सोळावा हप्ताह 28 फेब्रुवारी 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला आहे.
मागील हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील एका कार्यक्रमातून देशभरातील साडेआठ कोटीहून अधिक पात्र लाभार्थ्यांना दिला होता. दरम्यान, आता या योजनेच्या पुढील हप्त्याची शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे.
या योजनेचा पुढील सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार ? हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आले आहे.
सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच निवडणुकीच्या धामधुमीत पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील 17 वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील 17 वा हप्ता हा मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे.
तथापि, याबाबत शासनाच्या माध्यमातून तथा प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. यामुळे याचा हप्ता मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.