Pm Kisan Yojana Rule : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी शेतकरी हिताची योजना आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वकांशी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो.
या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. या अंतर्गत दिले जाणारे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. तर 2 हजाराचा एक हफ्ता याप्रमाणे याचे वितरण होत आहे.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत. मागील 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
विशेष बाब अशी की, या योजनेचा आगामी हप्ता अर्थातच पुढील 16 वा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाने पुढील हफ्त्याची तारीख सुद्धा डिक्लेअर केली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा आगामी 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.
यामुळे निश्चितच या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरेतर, ही योजना सुरू होऊन आता जवळपास 5 वर्षांहून अधिकचा काळ उलटला आहे. मात्र असे असले तरी या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
असाच एक प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाला मिळू शकतो का ? दरम्यान आज आपण याचा प्रश्नाचे थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम किसानचा लाभ एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाला मिळणार का ?
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार, या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाला मिळू शकत नाही. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील फक्त आणि फक्त एकच लाभार्थ्याला मिळू शकतो.
मात्र असे असले तरी जर वडील आणि मुलाच्या नावावर शेतजमीन असेल आणि ते दोघेही वेगळे राहत असतील तर अशावेळी त्या दोघांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
अर्थातच जर वडिलांच्या आणि मुलाच्या नावावर वेगवेगळी जमीन असेल आणि ते एकाच कुटुंबात राहत नसतील, वेगळे राहत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.