Pm Kisan Yojana : तुम्हीही पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी एक आहात का मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. पीएम किसान योजना ही केंद्र शासनाने 2019 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
केंद्रातील मोदी सरकारची ही एक महत्वाची शेतकरी हिताची योजना असून या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेच्या पैशांचे वाटप केले जात आहे.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 15 हप्ते देण्यात आले आहेत. मागील 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला होता.
आता या योजनेच्या लाभार्थ्यांना याचा सोळावा हप्ता केव्हा जमा होणार याची आतुरता लागलेली आहे. अशातच मात्र या योजनेच्या निकषात महत्त्वाचा आणि अतिशय मोठा बदल करण्यात आला आहे.
काय झाला बदल ?
खरे तर, पीएम किसान योजनेचा लाभ हा आयकर भरणारे शेतकरी, शासकीय कर्मचारी आणि अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना मिळत नाही.
आता मात्र या योजनेच्या निकषात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, ज्या शेतकऱ्यांनी 2019 पासून सलग दोन वेळा आयकर भरलेला असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पण, ज्या शेतकऱ्यांनी फक्त एकदा आयकर भरलेला असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. वास्तविक पीक कर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म 16) व आर्थिक विवरण पत्रे भरून घेतलेले शेतकरी आयकराच्या मर्यादेत आलेत.
यामुळे अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांच्याकडून रकमेची वसुली देखील केली गेली.
मात्र आता केंद्र शासनाने यात बदल केला असून केवळ एकदा आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी फक्त एकदा आयकर भरलेला असेल त्यांना आता पूर्वीचे थकीत हप्ते आणि आगामी 16 वा हप्ता देखील मिळणार आहे. निश्चितच अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी मोठी दिलासादायी ठरणार आहे.