Pm Kisan Yojana News : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेचा पुढील सतरावा हप्ता केव्हा जमा होणार याबाबत मोठे अपडेट हाती आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील सतरावा हप्ता हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होऊ शकतो.
परंतु याबाबत शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि एका आर्थिक वर्षात दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने पुढील 17 वा हप्ता हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
खरे तर या योजनेची घोषणा गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी करण्यात आली होती. 2018 मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि याची अंमलबजावणी 2019 पासून सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ देशभरातील साडेआठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना दिला जात आहे.
दरम्यान आज आपण पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी पहायची, तुमच्या गावातील किती शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत हे कसे बघायचे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे पी एम किसान योजनेचे स्वरूप ?
ही योजना एक केंद्रिय पुरस्कृत योजना आहे. केंद्रातील सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. एका आर्थिक वर्षात दिले जाणारे हे 6,000 रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळालेले असून मागील सोळावा हप्ता यवतमाळ येथील एका कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
तुमच्या गावातील किती शेतकरी पीएम किसानचा लाभ घेत आहेत ?
तुमच्या गावातील किती शेतकरी पीएम किसानचा लाभ घेत आहेत म्हणजे पीएम किसानची लाभार्थी यादी जर बघायची असेल तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर असणाऱ्या फार्मर कॉर्नर या विभागातील Beneficiary List या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग, तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यात राज्य, जिल्हा, ब्लॉक, गावाची माहिती भरावी लागणार आहे. सर्व माहिती भरल्यानंतर मग Get Report पर्याय निवडायचा आहे.
यानंतर तुमच्या गावाची लाभार्थी यादी तुमच्यासमोर येईल आणि तुम्ही ती तपासू शकता. तुम्ही तुमचे नाव आणि सर्व माहिती या यादीत पाहू शकता जर तुमचे नाव या यादीत नसेल तर तुमचा अर्ज का नाकारला गेला आहे किंवा त्याचे कारण काय आहे ते तुम्ही लाभार्थी स्थितीद्वारे पाहू शकणार आहात.