पीएम किसान योजनेचे नवीन एप्लीकेशन लॉन्च ! शेतकऱ्यांचा असा होणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा शुभारंभ 2017 मध्ये करण्यात आला आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे.यातून वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.

दरम्यान या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या योजनेचे नवीन ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हे अँप्लिकेशन लॉन्च झाले आहे. दरम्यान आज आपण या पीएम किसानच्या नवीन ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा :- राज्यात उद्यापासून पावसाला सुरुवात होणार! कोणत्या भागात पडणार पाऊस? भारतीय हवामान विभागाने स्पष्टच सांगितले

पीएम किसान योजनेच्या नवीन एप्लीकेशनचे वैशिष्ट्ये

दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांशी योजनेपैकी एक योजना म्हणून पीएम किसान योजनेला ओळखलं जातं. या योजनेचा लाभ सुरुवातीला दहा कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र या योजनेचा काही अपात्र लाभार्थ्यांनी देखील लाभ उचलला. यामुळे या योजनेच्या नियमात मोठा बदल करण्यात आला.

यानुसार आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच जमिनीची देखील पडताळणी केली जात आहे. यात केवायसी करताना मात्र शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण आता केंद्र शासनाने विकसित केलेल्या या नवीन ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्यात मोठी मदत मिळणार आहे. 

हे पण वाचा :- अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या सुधारित वाणाचे कांदा बियाणे आता ‘या’ ठिकाणी उपलब्ध होणार ! 

या ॲप्लिकेशनमुळे आता शेतकऱ्यांना आपला चेहरा दाखवून केवायसीची प्रक्रिया करता येणार आहे. म्हणजे या एप्लीकेशनमुळे फेस ऑथेंटीकेशनने केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या सुविधेमुळं ओटीपी (वन टाईम पासवर्ड) किंवा बोटांच्या ठशांशिवाय, चेहरा स्कॅन करुन शेतकरी दूरस्थपणे ई-केवायसी म्हणजे Know Your Customer (नो युवर कस्टमर) ची प्रोसेस पूर्ण करु शकतात.

या ॲप्लिकेशनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याच्या मदतीने शेतकऱ्यांना इतर शंभर शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे याच्या मदतीने अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांची केवायसी करून घेता येणार आहे. एका अधिकाऱ्याला 500 शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

हे पण वाचा :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार कापसाची खरेदी, तदनंतर….