Pm Kisan Yojana Latest Update : केंद्रातील मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आले. काँग्रेसला सत्ताबाहेर करून भाजपा सरकारने सत्ता काबीज केली. सत्तेत आल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.
दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला मदत दिली जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना तब्बल 14 हप्ते मिळाले आहेत. 14 वा हफ्ता 27 जुलै 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. खरंतर या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एक हप्ता मिळतो. यामुळे आता या योजनेच्या पुढील हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
तसेच या योजनेबाबत शेतकऱ्यांचे काही प्रश्न देखील आहेत. या योजनेचा शेतकरी पती आणि पत्नी दोघांनाही लाभ मिळू शकतो का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान आज आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेच्या नियमानुसार पीएम किसान योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला मिळणार आहे.
याचाच अर्थ शेतकरी पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना मिळतो. म्हणजे जर एका कुटुंबात जर कुटुंबप्रमुखाच्या पत्नीच्या नावावर जमीन असेल तर अशा कुटुंबातील कुटुंबप्रमुखाच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल. जर एका शेतकरी कुटुंबात पती आणि पत्नी दोघांच्या नावावर जमीन असेल तर मात्र अशा परिस्थितीमध्ये केवळ एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
15वा हफ्ता केव्हा मिळणार
या योजनेचा चौदावा हफ्ता जुलै महिन्याच्या शेवटी मिळाला होता. यानुसार आता या योजनेचा पंधरावा हप्ता हा नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा केला जात आहे.
तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण याबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही.