पीएम किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ महिन्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात ! वाचा लेटेस्ट अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana Latest News : 2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार देशातील गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना चालवत आहे. या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो.

ही दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेंपैकी एक आहे. याची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून याअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जात आहे. याअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत.

हे 6 हजार शेतकऱ्यांना दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे दिले जात आहेत. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट सरकारकडून जमा केला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 15 हप्ते केंद्रातील मोदी सरकारकडून मिळाले आहेत.

मागील पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

तसेच या योजनेचा चौदावा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक बटन दाबून देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आला होता.

आतापर्यंत या योजनेचे एकूण 15 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.म्हणजेच जो कोणी शेतकरी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेत असेल त्याला आत्तापर्यंत तीस हजार रुपये मिळाले आहेत.

दरम्यान या योजनेच्या सोळाव्या हफ्त्यासंदर्भात देखील एक महत्त्वाचे असे अपडेट समोर आले आहे. या योजनेचा सोळावा हफ्ता केव्हा जमा होऊ शकतो याबाबत मीडिया रिपोर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

या महिन्यात जमा होणार 16 वा हप्ता

आगामी वर्ष लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. लोकसभेच्या निवडणुकांसाठी फेब्रुवारी 2024 मध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. यामुळे पीएम किसानचा हप्ता हा यावेळी लवकरच शेतकऱ्यांना मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केंद्रातील सरकार या योजनेचा पुढील हप्ता लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू शकते असे सांगितले जात आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे.

मात्र निवडणुकांचा काळ पाहता फेब्रुवारीच्या पूर्वी देखील या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असाही अंदाज काही जाणकार लोकांनी बांधला आहे. तथापि, या योजनेचा सोळावा हप्ता नेमका केव्हा जमा होणार ? याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा