आनंदाची बातमी ! निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पीएम किसान योजनेत करणार मोठा बदल, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana Latest News : पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जात आहेत. 2 हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या निधीचे वितरण केले जात आहे.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 15 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. आता शेतकऱ्यांना या योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वेध लागले आहे.

या योजनेचा सोळावा हप्ता केव्हा जमा होणार हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेच्या स्वरूपात मोठा बदल होणार आहे. खरे तर एक फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे.

दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री महोदय शेतकऱ्यांना मोठी भेट देणार असे सांगितले जात आहे. निवडणूकांच्या पूर्वीच बजेट सादर होणार असल्याने या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचे हप्ते वाढवले जाणार आहेत. सध्या पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जात आहेत. आता मात्र दोन हजार रुपयांचे चार हप्ते दिले जातील असे बोलले जात आहे.

म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत 6000 ऐवजी शेतकऱ्यांना 8000 रुपये मिळू शकतात असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात होईल असा देखील दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. तथापि याबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता केव्हा मिळणार

पीएम किसान योजनेचा पुढील सोळावा हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार असा दावा केला जात आहे. मात्र या संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

पण आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिले असता दर चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा हप्ता हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जमा करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा