Pm Kisan Yojana : देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ही बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी विशेष खास ठरणार आहे. खरंतर पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
ही योजना 2019 पासून ते आजतागायत अविरतपणे सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण 16 हप्ते मिळाले आहेत.
म्हणजेच ज्या शेतकऱ्याने अगदी पहिल्या हप्त्यापासून या योजनेचा लाभ घेतला असेल त्याला आत्तापर्यंत 32 हजार रुपये मिळाले असतील. या योजनेचा मागील सोळावा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला निर्गमित झाला होता.
दरम्यान आता या योजनेचा पुढील सतरावा हफ्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वाराणसी येथे आयोजित एका शेतकरी परिषदेतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
यासंदर्भात देशाचे नवोदित कृषी मंत्री आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी अपडेट दिली आहे. चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे, या योजनेचा पुढील सतरावा हफ्ता हा 18 जून 2024 ला देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
अर्थातच या योजनेचे पैसे येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. नंतर भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएने सत्ता स्थापित केली.
केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. त्यांनी पीएम किसान योजनेचा १७ वा हफ्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली. दरम्यान आता हा सतरावा हप्ता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
येत्या दोन दिवसांनी अर्थातच 18 जूनला देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला दोन हजार रुपये मिळणार आहेत. वाराणसी येथे आयोजित शेतकरी परिषदेतून हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार अशी माहिती समोर येत आहे.