Pm Kisan Yojana : बातमी कामाची! शेतकरी मित्रांनो ई-केवायसी करून घ्या, ‘या’ तारखेला जारी होणारं पीएम किसानचा 12 वा हफ्ता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : भारतातील शेतकऱ्यांच्या (Farmer) भल्यासाठी संपूर्ण देशात मायबाप सरकारने (Government) अनेक शेतकरी हिताच्या योजना (Farmer Scheme) कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना (Yojana) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा (Government Scheme) देखील समावेश आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 2018 साली या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला आहे.

पीएम किसान सम्मान निधि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये पाठवले जातात. हे सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना एकूण तीन हप्त्यांत दिले जातात. म्हणजेच दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे तीन हप्ते एका वर्षात शेतकरी बांधवांना मिळत असतात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकूण अकरा हप्ते मिळाले आहेत. दरम्यान आता देशातील करोडो शेतकरी बांधव या योजनेच्या बाराव्या हफ्त्याची वाट पाहत आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या राज्यातील जवळपास एक कोटी पाच लाख शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या राज्यासाठी देखील ही योजना एक महत्त्वाची शेतकरी हिताची योजना बनली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) सुरू झाल्यापासून या योजनेत अनेक आमूलाग्र बदल देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत.

मित्रांनो खरे पाहता मध्यंतरी या योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनाही लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या अनुषंगाने मायबाप सरकारने अशा शेतकऱ्यांवर कडक कारवाई करत त्यांच्याकडून या योजनेचा पैसा वसूल केला जात आहे. शिवाय आता या योजनेसाठी ई-केवायसी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. मित्रांनो केंद्र सरकारने ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही तारीख अंतिम केली होती. मात्र अद्याप या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही त्यांच्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया मायबाप शासनाने सुरू ठेवली आहे.

गेल्या वर्षी 9 ऑगस्टलाचं हप्ता आला होता बर…!
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता मागील वर्षी 9 ऑगस्ट रोजी आला होता. यंदा मात्र 19 सप्टेंबर उलटूनही शेतकऱ्यांना बारावा हप्ता मिळालेला नाही. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, या योजनेतील अडथळे लक्षात घेऊनच ई-केवायसी अनिवार्य करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पीएम किसान पोर्टलला भेट देऊन शेतकरी अजूनही ई-केवायसी करू शकतात.

ई-केवायसी केल्यानंतर, त्याची सरकारी पातळीवरून पडताळणी केली जाईल आणि हप्ता पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचण्यास सुरुवात होईल. पडताळणीमुळे, PM किसानच्या 12व्या हप्त्यात थोडा विलंब झाला आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यावर जर विश्वास ठेवला तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पर्यंत या योजनेचा बारावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment