Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयाचा हप्ता पात्र शेतकऱ्यांना दिला जातो. हे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकूण तीन टप्प्यात दिले जातात. म्हणजेच दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम देण्याचे प्रावधान या योजनेत आहे.
दरम्यान आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील आठ कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांना 12 हप्ते देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत योजनेचे पात्र शेतकरी तेरावा हप्ता येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेसाठी आपल्या राज्यातील एक कोटीच्या आसपास शेतकरी पात्र आहेत. दरम्यान आता केंद्र शासनाकडून या योजनेच्या तेराव्या हफ्त्याची तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत दिला जाणारा तेरावा हप्ता हा केवळ आधार संलग्न बँक खाते असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांनाचं या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. दरम्यान आता केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत दिला जाणारा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन आहे. आणि याच दिवशी हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून या 13व्या हफ्त्याचीं वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे अधिकाऱ्याच्या माध्यमातून सांगितलं जात आहे.