Pm Kisan Yojana : शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यातील काही योजना केंद्र शासनाने सुरू केलेल्या आहेत तर काही योजना राज्य शासनाने सुरू केलेल्या आहेत. 2014 मध्ये सत्ता स्थापित केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सुद्धा आतापर्यंत असंख्य योजना सुरू केल्या आहेत.
या योजनांच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. या शेतकरी हिताच्या योजनांमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसान मानधन योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
दरम्यान आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसान मानधन योजना नेमक्या आहेत तरी कशा आणि याचा एकत्रित लाभ मिळू शकतो का ? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा आहोत.
पीएम किसान सन्मान निधी योजना : मोदी सरकारने या योजनेची सुरुवात 2019 मध्ये केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. तर या योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता दिला जातो. एका आर्थिक वर्षात या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळतात. जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळालेले आहेत.
मागील सोळावा हप्ता हा यवतमाळ येथून एका कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या सतराव्या हफ्त्याबाबत देखील हात अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा सतरावा हप्ता लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्राच्या या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
पीएम किसान मानधन योजना : ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील वृद्धापकाळ आर्थिक सहाय्य मिळावे, त्यांना देखील पेन्शन मिळावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्षांनी 3000 रुपये मासिक पेन्शन देण्याचे प्रावधान आहे.
मात्र ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. म्हणजे जे शेतकरी या योजनेत सहभागी होतील त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. या योजनेत सुरुवातीला शेतकऱ्यांना काही रक्कम गुंतवावी लागते आणि यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतात.
18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतात. या योजनेत अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना 55 रुपये प्रति महिना ते दोनशे रुपये प्रति महिना पर्यंतची गुंतवणूक करावी लागते. या योजनेत जे शेतकरी 18 व्या वर्षी सहभाग नोंदवतात त्यांना प्रति महिना 55 रुपये गुंतवणूक करावी लागते.
अठराव्या वर्षी सहभाग नोंदवला तर वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत सदर शेतकऱ्याला प्रति महिना 55 रुपये भरावे लागणार आहेत. दुसरीकडे एखाद्या शेतकऱ्याने वयाच्या चाळीसाव्या वर्षी यामध्ये गुंतवणूक केली तर त्याला प्रतिमहिना 200 रुपये भरावे लागतात.
या दोन्ही योजनेचा एकत्रित लाभ मिळतो का?
अनेकांच्या माध्यमातून पी एम किसान चा आणि किसान मानधन योजनेचा एकत्रित लाभ घेता येऊ शकतो का असा सवाल उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र असतील आणि त्यांना पीएम किसान मानधन योजनेचा देखील लाभ घ्यायचा असेल तर ते या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेले शेतकरी थेट मानधन योजनेत सामील होऊ शकतात. एकाच वेळी या दोन्ही योजनेचा लाभ घेता येणे शक्य आहे.