Pm Kisan Yojana : मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी संपूर्ण देशात वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Farmer Scheme) कार्यान्वित आहेत.
2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) देखील पीएम किसान सम्मान निधि (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) नामक शेतकरी हिताची योजना संपूर्ण भारत वर्षात लागू केली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेत मोठा अमुलाग्र बदल बघायला मिळत आहे.
मध्यंतरी या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे या योजनेसाठी आता केंद्र सरकारने (Central Government) केवायसी करणे बंधनकारक केले आहे. आता पीएम किसान योजनेचे पैसे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य झाले आहे.
ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ता मिळण्यापासून शेतकरी वंचित राहू शकतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचे 11 हप्ते पाठवण्यात आले असून आता पुढील म्हणजेच 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला हस्तांतरित केला जाऊ शकतो.
ई-केवायसी अनिवार्य
पीएम किसान योजनेचे पैसे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक असल्याची माहिती आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ता मिळण्यापासून शेतकरी वंचित राहू शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
आठ दिवस बाकी
शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारने नुकतीच ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख 31 जुलै होती, जी आता एक महिना वाढवून 31 ऑगस्ट 2022 करण्यात आली आहे. अशा प्रकारे, ई-केवायसी करण्यासाठी फक्त आठ दिवस उरले आहेत.
अशा प्रकारे ई-केवायसी करा
ई-केवायसी करण्याचा मार्ग खूप सोपा आहे.
सर्वप्रथम शेतकऱ्याला pmkisan.gov.in वर जावे लागेल.
आता येथे फार्मर कॉर्नरचा पर्याय दिसेल.
ई-केवायसीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, जो तुम्हाला भरावा लागेल.
आता तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.