पीएम किसानचा 14वा हफ्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका ! कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. केंद्रातील मोदी सरकारने या योजनेचा शुभारंभ केला असून या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी देशातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात आहेत.

दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एका वर्षात तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले असून 14 वा हप्ता हा गेल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

27 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देशभरातील जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा 14 वा हप्ता वितरित केला आहे. मात्र असे असले तरी या योजनेच्या अनेक शेतकऱ्यांना हा चौदावा हप्ता मिळालेला नाही.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता न केल्यामुळे या शेतकऱ्यांना हा चौदावा हप्ता मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान जे शेतकरी या चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी राज्यात एक महत्त्वाचे अभियान सुरू करण्यात आले आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार पी एम किसानच्या 14व्या हफ्त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

यामुळे वंचित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची संधी पुन्हा उपलब्ध झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही, बँक खाते आधारशी संलग्न केलेले नाही, तसेच भूमि अभिलेख नोंदणी अद्ययावत केलेली नाही अशा पीएम किसानच्या शेतकऱ्यांना या योजनेचा हफ्ता मिळालेला नाही.

अशा संबंधित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी संबंधित शेतकऱ्यांना अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी, ई-केवायसी प्रमाणिकरण व बॅंक खाती आधार संलग्नीकरण करण्यास १५ ऑगस्टपर्यंत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ही विशेष मोहीम राज्यात राबवली जात आहे.