Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना ही 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही स्कीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत ही योजना अविरतपणे सुरू आहे.
या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. पण हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त दिले जात नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यांमध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 15 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा नियमित लाभ मिळत आहे त्यांना आत्तापर्यंत 30 हजार रुपयांची रक्कम मिळालेली असेल.
दरम्यान या योजनेचा मागील पंधरावा हप्ता हा गेल्यावर्षी 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आला होता.
यामुळे सध्या या योजनेच्या सोळाव्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान याच सोळाव्या हफ्त्यासंदर्भात केंद्र सरकारने एक मोठी माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने या योजनेचा सोळावा हप्ता केव्हा जारी केला जाणार याची तारीख डिक्लेअर केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सोळाव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्यासाठी आता मुहूर्त लाभला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केव्हा जमा होणार सोळावा हफ्ता ?
पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे.
15 नोव्हेंबर 2023 ला या योजनेचा पंधरावा हप्ता वर्ग झाल्यानंतर आता या योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारीच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा सोळावा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. खरेतर आत्तापर्यंत मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा होईल असा दावा केला जात होता.
अखेरकार आता या सोळाव्या हप्त्याची तारीख केंद्र शासनाने जाहीर केली आहे. यानुसार आता 28 फेब्रुवारीला या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. निश्चितच केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.