Pm Kisan Yojana : धक्कादायक ! 2 कोटी शेतकऱ्यांना नाही मिळाला पीएम किसानचा 12 वा हप्ता, तुम्हाला 2000 रुपये मिळाले की नाही ‘या’ पद्धतीने करा चेक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : पीएम किसान सम्मान निधि योजनेचा (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) बारावा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत देशातील जवळपास 8 कोटी पात्र शेतकर्‍यांना (Farmer) देऊ करण्यात आला.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पीएम किसान सम्मान निधि योजना (Yojana) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा शुभारंभ दोन हजार एकोणवीस मध्ये वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यावधी शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. हे वार्षिक सहा हजार रुपये पात्र शेतकरी बांधवांना एकूण तीन हफ्त्यात मिळतात. म्हणजे एका वर्षात पात्र शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देऊ केले जातात.

आतापर्यंत या योजनेच्या (Farmer Scheme) माध्यमातून बारा हप्ते पात्र शेतकरी बांधवांना मिळाले आहेत. बारावा हप्ता आजच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. मात्र या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे. मित्रानो आज फक्त आठ कोटी शेतकरी बांधवांना या योजनेचा बारावा हप्ता देऊ करण्यात आला आहे. खरं पाहता या योजनेचा अकरावा हप्ता देशातील जवळपास दहा कोटी शेतकरी बांधवांना मिळाला होता. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तब्बल दोन कोटीने कमी झाली आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट

खरं पाहता यावेळी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची भीती आधीच व्यक्त करण्यात आली होती. मात्र तब्बल दोन कोटी शेतकरी बांधवांना 12वा हप्ता मिळणार नाही याची कल्पना कोणीच केली नव्हती. 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथून किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी केला होता.

हा हप्ता म्हणून देशातील शेतकऱ्यांना एकूण 21,000 कोटी रुपये देण्यात आले. मात्र, यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ 16 हजार कोटी रुपयेच पाठवण्यात आले आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या खात्यावर 12वा हप्ता पाठवण्यासाठी आधीच्या हप्त्याच्या तुलनेत 5 हजार कोटी रुपये कमी खर्च करण्यात आले आहेत म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे.

भुलेखांच्या पडताळणीमुळे झाले लाभार्थी शेतकरी कमी

वास्तविक, बाराव्या हप्त्यासाठी भुलेखांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू होती. यामुळेच सप्टेंबर महिन्यात हा हप्ता शेतकरी बांधवांना मिळू शकला नव्हता. आता भुलेख पडताळणीचे काम पूर्ण झाले असून आज शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले आहेत. प्रत्यक्षात यावेळी भुलेखांच्या पडताळणीत मोठ्या प्रमाणात लाभार्थी अपात्र ठरले. एकट्या उत्तर प्रदेशातून 21 लाख लोक अपात्र आढळले आहेत. 

अशा प्रकारे लाभार्थी यादीत शेतकरी बांधवांना नाव तपासता येणार 

  • pmkisan.gov.in या PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • आता होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ विभागात क्लिक करा.
  • फार्मर कॉर्नर विभागात ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.
  • तपशील भरल्यानंतर ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment