भारत 130 कोटी जनसंख्या असलेला देश शेतीप्रधान देश म्हणुन संपूर्ण जगात विख्यात आहे. शेतीप्रधान (Agriculture Country) असण्याचे कारण म्हणजे आपल्या देशातील निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे.
यामुळे देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मायबाप सरकारकडून (Central Government) देखील नेहमीच प्रयत्न केले जात असतात. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Farmer Scheme) राबविल्या आहेत.
यापैकी एक म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) ही योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना (Ambitious Scheme) आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात.
सरकार ही रक्कम शेतकऱ्यांना 2 हजार रुपयाचा एक हफ्ता असे वर्षातून तीन हप्त्यांमध्ये देते. या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 10 हप्ते जारी केले आहेत.
आता शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र 11 वा हप्त्यापूर्वी लाभार्थ्यांना एक महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे अन्यथा पुढील हप्त्यापासून त्यांना वंचित ठेवले जाऊ शकते.
सरकारने पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आता बंधनकारक केली आहे. यामुळे या सन्मान निधीच्या 11व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना 31 मे पूर्वी ई-केवायसी करावी लागणार आहे.
जर एखाद्या लाभार्थी शेतकऱ्याने ई-केवायसी केली नाही, तर सरकार त्याच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये टाकणार नाही. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
आता लाभार्थी घरी बसून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. काही काळापूर्वी पोर्टलवर ही सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन वेबसाइटवर ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
यामुळे केवायसी करणे आता तुलनेने सोपे झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, शेतकरी ही प्रक्रिया ऑफलाइन देखील पूर्ण करू शकतात. यासाठी त्यांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.