PM Kisan Samman Nidhi Yojana 10th installment: देशातील लाखो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारकडून आनंदाची बातमी मिळणार आहे.
पुढील महिन्यात 15 डिसेंबरपर्यंत, सरकार PM किसान योजनेचा 10वा हप्ता (PM Kisan Yojna 10th Instalment) जारी करू शकते.
जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही अजून PM किसान योजनेत(Pm Kisan Yojna) नोंदणी केली नसेल, तर हीच योग्य वेळ आहे.
जर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतील.
सरकारने आतापर्यंत भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, सरकारने 10व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्याची पूर्ण तयारीही केली आहे. ही रक्कम 15 डिसेंबरपर्यंत जारी केली जाऊ शकते.
केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देते –
पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. याअंतर्गत सरकार लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम करण्यात आले आहेत, ज्यांचे पालन केल्यावर शेतकऱ्यांना त्याचा लाभ सहज घेता येईल.
शासन ही रक्कम शेतकऱ्यांना ऑनलाईन वर्ग करते. त्याचबरोबर राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, महसूल नोंदी आदींची पडताळणी करून ती बरोबर असल्याचे लक्षात आल्यावरच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळते.