Pm Kisan News : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान च्या लाभार्थ्यांना आज अर्थातच 15 नोव्हेंबर 2023 रोजी या योजनेचा पंधरावा हप्ता वितरित केला जाणार आहे.
हा हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जाणार आहे. भाऊबीजच्या दिवशी हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याने देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून ही एक मोठी भेट राहणार आहे.
खरंतर या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 14 हप्ते देण्यात आले आहेत. 14 वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आला होता. आता पंधरावा हप्ता आज अर्थातच 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
झारखंडमधून जमा होणारा हफ्ता
मीडिया रिपोर्ट नुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान या दौऱ्यावर असतानाच एका कार्यक्रमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे.
पीएम मोदी एक बटन दाबून या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये टाकणार आहेत. डी बी टी च्या माध्यमातून या योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. यामुळे दिवाळीच्या काळात पी एम किसान साठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पीएम किसान सन्मान नीधी योजना काय आहे?
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात पाच वर्षांपूर्वी अर्थातच 2019 मध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशा एकूण तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे. विशेष म्हणजे दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. आतापर्यंत 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत आणि आज 15 वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
दरम्यान पी एम किसानच्या 15व्या हफ्त्याचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. सरकारी कर्मचारी, विद्यमान मंत्री, आमदार, पंचायत प्रमुख आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेत असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
तसेच ज्या लाभार्थ्यांनी चुकीचं बँक खातं दिलं असेल आणि त्यांचं बँक खातं आणि आधार कार्ड यावरील नावात फरक असेल तर अशा लाभार्थ्यांना देखील या योजनेचा पंधरावा हप्ता दिला जाणार नाही.
आधार कार्ड, लिंग, पत्ता आदी गोष्टी नोंदवण्यात चूक केली असेल तर असेही शेतकरी पंधराव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यासोबत आधार संलग्न केलेले नसेल, केवायसी केलेली नसेल आणि जमिनीची पडताळणी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा पंधरावा हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.