Pm Kisan News : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना असून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास एक कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. दरम्यान आता या योजनेच्या तेराव्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू झालेली वर्तमान मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास आठ कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एकरक्कमी न देता टप्प्याटप्प्याने दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेचे स्वरूप मोदी सरकारने आखले आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 12 हप्ते मिळाले आहेत.
म्हणजेच जर एखादा शेतकरी बांधव या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेत असेल तर त्याला 24,000 रुपये आतापर्यंत मिळाले असतील. दरम्यान, आता शेतकरी बांधव या योजनेच्या तेराव्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत देशभरातील जवळपास आठ कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना 23 जानेवारी रोजी म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीच्या दिवशी या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना तेरावा हफ्ता मिळणार आहे.
खरं पाहता, 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम हा दरवर्षी 24 जानेवारीपासून सुरू होतो. मात्र 2021 सालापासून नरेंद्र मोदी सरकारने हा पायंडा मोडीत काढत 23 जानेवारीपासून म्हणजेच नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीच्या दिनापासून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू केला आहे. अशा परिस्थितीत पीएम किसानच्या तेराव्या हफ्त्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे देखील मुहूर्त साधले गेले आहे आणि नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीचे देखील.
हाती आलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून या संवादादरम्यानच पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना दोन हजाराचा हप्ता देखील हस्तांतरित केला जाणार आहे. दरम्यान या योजनेचा तेरावा हप्ता हा ज्या शेतकऱ्यांनी केव्हायसी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे तेराव्या हफ्त्यासाठी शेतकरी पात्र आहेत की नाही हे आधी चेक करणं महत्वाचं आहे.
पीएम किसानचा 13वा हप्ता मिळेल की नाही कसं चेक करणार?
पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळेल की नाही हे चेक करण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर वर जा. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. यानंतर एक पेज ओपन होईल. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना ‘नोंदणी क्रमांक’ भरावा लागणार आहे.
जर नोंदणी क्रमांक माहिती तर मोबाइल नंबरद्वारे स्टेटस तपासले जाते. यासाठी ‘Search by Mobile number’ हा ऑप्शन निवडावा लागतो. त्यानंतरं नोंदणीकृत मोबाइल नंबर एंट्री करावा लागतो. यानंतर समोर इंटर इमेज टेक्स्ट दिसेल, ज्याच्या बॉक्समध्ये दिलेला इमेज कोड टाकावा लागणार आहे. यानंतर Get data वर क्लिक करावे लागते. यानंतर संबंधित शेतकऱ्याचं स्टेटस त्या ठिकाणी डिस्प्ले होते.