शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पीएम किसान योजनेचा 15वा हफ्ता दिवाळीपूर्वी मिळणार का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Breaking News : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजना या महत्त्वाकांशी योजनेबाबत एक अतिशय मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर, या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे.

आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. पण 14 वा हफ्ता ज्यावेळी दिला गेला त्यावेळी हा कालावधी पाच महिन्यांचा झाला होता. म्हणजेच तेरावा हप्ता मिळाल्यानंतर तब्बल पाच महिन्यानी 14 वा हप्ता मिळाला होता.

आता 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार ? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे सध्या संपूर्ण देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना देखील पैशांची निकड भासत आहे.

यामुळे सणासुदीचा काळ पाहता या योजनेचा हप्ता हा लवकर दिला गेला पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील महिन्यात 12 तारखेपासून दिवाळीचा मोठा सण सुरू होणार आहे. दरम्यान या दिवाळी सणाच्या पूर्वीच या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना दिला गेला तर त्यांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे. अशा या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेचा पंधरावा हफ्ता केव्हा मिळू शकतो याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच दिवाळी सणानंतरच या योजनेचा पुढील हफ्ता जमा होऊ शकतो असे मीडिया रिपोर्ट मधून स्पष्ट होत आहे.

यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता आपण पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे शोधायचे ? याविषयी जाणून घेणार आहोत.

लाभार्थी यादीत नाव कसे शोधणार ?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे. https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करावी लागणार आहे. एवढी माहिती भरल्यानंतर तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर ओपन होणार आहे. या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. जर यादीत तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात हे स्पष्ट होते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा