Pm Kisan And Namo Shetkari Yojana : केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या पुढील 16 व्या हप्त्याची तारीख डिक्लेअर केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
खरे तर या योजनेचा मागील हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता हा शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर 2023 ला देण्यात आला होता. त्यामुळे या योजनेचा पुढील हप्ता केव्हा वितरित होणारा असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत होता.
दरम्यान शेतकऱ्यांची ही आतुरता आता लवकरच संपुष्टात येणार असून या योजनेचा पुढील 16 वा हप्ता 28 फेब्रुवारीला करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. यामुळे पीएम किसान च्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याबाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे. नमो शेतकरीच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी राज्य शासनाने 1792 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
नमो शेतकरीचा पहिला हप्ता राज्यातील 85 लाख 60,000 शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, आता या योजनेचा दुसरा हप्ता राज्यातील 95 लाख शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
म्हणजेच लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी माहिती दिली आहे.
केव्हा जमा होणार दुसरा हफ्ता
नमो शेतकरीचा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे. खरे तर लोकसभा निवडणुकांसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
फेब्रुवारी अखेरीस चार हजाराचा लाभ
एकंदरीत, पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे दोन हजार रुपये 28 फेब्रुवारीला जमा होणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये देखील या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत.
म्हणजेच पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे प्रत्येकी दोन हजार असे एकूण चार हजार रुपये या महिन्याच्या अखेरीस राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.