बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदनी खोटी करून जिल्ह्यातील 2770 अपात्रांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेतला असल्याचे.पडताळणी दरम्यान लक्षात आले आहे.यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटीस बजावून रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तर नोटीस बजावून 8 महिन्यांनंतरही बहुतांश शेतकऱ्यांनी रक्कम परत केलेली नाही. आता विभागाने अपात्र शेतकऱ्यांचे खाते जप्त करून पाठवलेली रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने योजनेचा लाभ घेतला अशा 2770 शेतकर्यांची ओळख पटली, आसून शेतकऱ्यांची चौकशी करण्यात आली.
अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटीस बजावून १५ दिवसांत रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते,अशी माहिती कृषी उपसंचालक डॉ.उदयभान गौतम यांनी दिली. ह्यातील काही शेतकरी हे आयकर भरणारे, सरकारी पेन्शनधारक, शिक्षण मित्र आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्य आसल्या चे आढळून आले आहे.
तर ही योजना केंद्र सरकारने गरजू शेतकऱ्यांसाठी 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केली. तर या योजनेतील तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात. सुरुवातीला स्वलिखित प्रतिज्ञापत्रावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता. यामुळे काही अपात्र शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने लाभ घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्याने सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची चौकशी करण्यात आली.
आसून त्यापैकी आतापर्यंत केवळ 700 शेतकऱ्यांनी पैसे परत केले आहेत.