Pm Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयामुळे आता लाभार्थी संख्या वाढणार आहे. पंतप्रधान आवास योजना ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत बेघर लोकांना घर उपलब्ध करून दिले जाते.
या अंतर्गत घरासाठी अनुदान दिले जाते. ही योजना शहरी आणि ग्रामीण भागात राबवली जात असून आत्तापर्यंत हजारो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या योजनेमुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असून आता केंद्रातील मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये या योजनेच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत केले जात आहे. पीएम आवास योजनेचे नियम शिथिल करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलाय.
आगामी काळात या योजनेचा देशभरातील तीन कोटी लोकांना लाभ देण्याचा मानस सरकारने बोलून दाखवला आहे. दरम्यान आता आपण या योजनेच्या कोणत्या नियमांमध्ये सरकारने बदल केला आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
पीएम आवास योजनेचे हे नियम बदललेत
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधी पीएम आवास योजनेचा लाभ फक्त आणि फक्त दहा हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना मिळत होता. मात्र आता सरकारने ही अट शिथिल केली असून किमान 15000 रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल असे म्हटले जात आहे.
आधी या योजनेचा अडीच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या लोकांना लाभ मिळत होता. पण आता पाच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या लोकांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
आधी बागायती जमीन असणाऱ्या लोकांना याचा लाभ मिळत नव्हता मात्र यापुढे बागायती जमीन असणाऱ्या लोकांनाही याचा लाभ मिळेल असे बोलले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 70 वर्षांपेक्षा कमी असावे.
सत्तर वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. जर एखाद्या व्यक्तीला आधीच शासकीय गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळालेला असेल तर अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.