नोव्हेंबर महिन्यात फिरायला जाणार आहात ? ‘या’ ठिकाणाला नक्कीच जा, फुल टू पैसा वसुल होणार ट्रिप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Places To Visit In November : सध्या महाराष्ट्रासहित देशातील विविध भागांमध्ये ऑक्टोबर हिट पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक पूर्णपणे बेजार झाले आहेत. यामुळे थंड हवामानाच्या ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. देशातील बहुतांशी हिल स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पुढल्या महिन्यापासून राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील हवामानात पुढील महिन्यात मोठा बदल होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे. दरम्यान जर तुम्ही थंडीच्या ऐन सुरुवातीलाच कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण नोव्हेंबर महिन्यात एक्सप्लोर करता येतील अशा काही पर्यटन स्थळांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे

जयपुर, राजस्थान : राजस्थानमध्ये फिरण्यासारखी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये जयपूर शहराचा देखील समावेश होतो. जयपुर हे फिरण्यासाठी खूपच उत्कृष्ट ठिकाण आहे. जयपुर राजस्थानची राजधानी देखील आहे. या शहराला पिंक सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळख प्राप्त झाली आहे. जगभरातील पर्यटक जयपूर शहराला भेटी देतात. गुलाबी नगरी म्हणून ओळखले जाणारे हे शहर पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय बनले आहे.

या ठिकाणी तुम्ही नोव्हेंबर महिन्यात फिरण्याचा प्लॅन बनवू शकता. नोव्हेंबर महिना गुलाबी शहराला भेट देण्यासाठी खूपच उत्कृष्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक सुंदर किल्ले आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही तुमच्या परिवारासमवेत हिवाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच कुठे ट्रिपला जाणार असाल तर या ठिकाणाला एकदा नक्कीच भेट देऊ शकता.

वाराणसी, उत्तर प्रदेश : वाराणसी अर्थातच काशी एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो भाविकगण काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी येतात. जर तुम्हीही काशी विश्वनाथाच्या दर्शनाचा प्लॅन बनवत असाल तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर राहणार आहे. वाराणसी येथे काशी विश्वनाथाच्या दर्शनासोबतच इतरही अन्य धार्मिक स्थळाला भेटी दिल्या जाऊ शकतात. 

मुंबई, महाराष्ट्र : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी म्हणून मुंबई शहराला ओळखले जाते. मुंबई शहर मायानगरी, बॉलीवूड नगरी, स्वप्ननगरी अशा विविध नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे शहर पर्यटनासाठी खूपच लोकप्रिय बनले आहे. मुंबई शहराबाबत अस म्हटले जाते की हे शहर कधीच झोपत नाही. या शहराचा झगमगाट पर्यटकांना भुरळ घालत आहे. जर तुम्हीही दिवाळीच्या सुरुवातीला कुठे फिरण्याचा बेत आखत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. हिवाळ्यातील थंड वातावरण मुंबई शहराला भेट देण्यासाठी उत्कृष्ट ठरते.

रणथंबोर, राजस्थान : रणथंबोर हे एक प्रसिद्ध अभयारण्य आहे. राजस्थान मधील हे एक आणखी महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. तुम्ही जर राजस्थान करण्याचा प्लॅन बनवत असाल तर रणथंबोर या अभयारण्याला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला विविध वन्यजीवांचे दर्शन होणार आहे. खरंतर हे अभयारण्य वाघांसाठी लोकप्रिय आहे. म्हणजे तुम्हाला येथे वाघोबाचे देखील दर्शन घेता येणार आहे. जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कॉलिटी टाईम घालू इच्छित असाल तर तुम्ही इथे नक्कीच भेट दिली पाहिजे.

आग्रा, उत्तर प्रदेश : जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात कुठे फिरायचे असेल तर तुम्ही आग्रा येथील ताजमहलला नक्कीच भेट दिली पाहिजे. आग्रामध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत पण जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य अर्थातच ताजमहल या सर्व ठिकाणांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. जर तुम्ही ही नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच हिवाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच कुठे फिरायचा प्लॅन बनवत असाल तर तुम्ही ताजमहल एक्सप्लोर करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत किंवा परिवारासमवेत जाऊ शकणार आहात.