‘या’ तारखेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याचे पैसे, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या नैसर्गिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये.

शिवाय उत्पादित झालेल्या मालाला देखील अपेक्षित असा दर मिळत नाहीये. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी पिक विमा योजना राबवली जात आहे.

या योजनेअंतर्गत पिकाचा विमा काढला जात आहे. दरम्यान याच पीक विमा योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील 7500 शेतकऱ्यांनी फळ पिक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. मात्र यापैकी फक्त साडेतीन हजार शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली.

मात्र 2940 शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. महसूल मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक कारणांमुळे संबंधित शेतकऱ्यांची पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम रखडलेली आहे.

अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर फळ पिक विम्याची नुकसान भरपाई खात्यावर वर्ग केली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरत होती.

याच मागणीच्या पार्श्वभूमीवर या संबंधित 2940 शेतकऱ्यांची बाकी राहिलेली नऊ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम 3 जानेवारी पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे निर्देश राज्याच्या कृषिमंत्र्यांनी निर्गमित केले आहेत.

त्यामुळे नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील यासंबंधीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. खरे तर याबाबत मुंडे यांच्या दालनात नुकतीच बैठक संपन्न झाली होती.

या बैठकीत मुंडे यांनी पिक विमा कंपन्यांना लवकरात लवकर फळपीक विमा योजनेची नुकसान भरपाईची रक्कम रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा