महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! रब्बी हंगामातही मिळणार एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज, वाचा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Yojana : भारत हा एक कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. पण अलीकडे या कृषीप्रधान देशात कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आला आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापूर, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ किडींचे आणि रोगांचे सावट यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.

या संकटांमुळे शेतकऱ्यांना अहोरात्र काबाडकष्ट करूनही चांगले उत्पादन मिळत नाहीये. अशा या संकटसमयी शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना चालवल्या जात आहेत. यामध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेचा देखील समावेश होतो.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ही योजना केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पिकाचा विमा उतरवला जात आहे. यामुळे जर नैसर्गिक आपत्ती आली आणि पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. दरम्यान या सरकारच्या योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे.

वर्तमान शिंदे-फडणवीस सरकारने पीक विमा योजनेमध्ये मोठा बदल केला असून आता शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेता येत आहे. याची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे या चालू रब्बी हंगामातही याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. म्हणजे रब्बी हंगामातील पिकांचा विमा देखील आता एक रुपयात उतरवता येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना यासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेचे अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

कुठे करणार अर्ज ?

रब्बी हंगामासाठी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी बांधव ऑनलाईन अर्ज करू शकतात. किंवा शेतकरी बांधव त्यांच्या जवळील सीएससी सेंटर वर जाऊन देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

मिळालेल्या माहितीनुसार, पीक विमा योजनेत रब्बी ज्वारीसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर बागायती गहू, हरभरा आणि रब्बी कांद्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो.

तसेच उन्हाळी भात व भुईमूग पिकांसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत अर्ज करता येईल आणि या योजनेत सहभाग नोंदवता येईल असे शासनाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.

शेतकऱ्यांना विम्यासाठी फक्त एक रुपया भरावा लागेल

रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे पिक विमा योजनेअंतर्गत जर शेतकरी बांधव आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू इच्छित असतील तर तिथे सुद्धा शेतकऱ्यांना फक्त एक रुपया द्यावा लागणार आहे.

अर्ज भरण्यासाठी लागणारी रक्कम विमा कंपन्यांच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र चालकांना म्हणजेच सीएससी सेंटर चालकांना दिली जाणार आहे. प्रति अर्ज 40 रुपये कंपन्यांच्या माध्यमातून सीएससी सेंटर चालकांना मिळणार आहेत.