वाटाण्याच्या ‘या’ वाणाची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! घरबसल्या मागवता येणार बियाणे, इथं द्यावी लागणार ऑनलाईन ऑर्डर, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pea Farming : वाटाणा हे रब्बी हंगामात उत्पादित केले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. आपल्या राज्यातही काही शेतकरी बांधव वाटाण्याची शेती करत आहे.

वाटाण्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरत आहे. मात्र या पिकाच्या सुधारित जातींची शेती करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्यांनी वाटाण्याच्या सुधारित जातींची लागवड केली तर त्यांना निश्चितच चांगले उत्पादन या ठिकाणी मिळू शकणार आहे.

दरम्यान आज आपण वाटाण्याच्या दोन प्रमुख आणि सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणजे या जातीचे बियाणे शेतकऱ्यांना कुठून ऑर्डर करता येऊ शकते याविषयी देखील आज आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वाटाण्याच्या सुधारित जाती कोणत्या?

PB-89: या वाणाची पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. ही वाटाण्याची एक सुधारित जात आहे. या जातीचे बीन्स म्हणजे बिया जोड्यांमध्ये वाढतात. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीचे पीक पेरणीनंतर सुमारे ९० दिवसांनी परिपक्व होत असते.

या वाणाच्या बिया खायला गोड लागतात. या जातीपासून एकरी 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जात आहे. तथापि उत्पादनाचा हा आकडा हवामान, जमीन, नियोजन इत्यादी घटकांवर अवलंबून राहणार आहे.

अर्केल : हा एक प्रकारचा युरोपियन वाण आहे. जे शेतकरी नेहमी वाटाण्याची लागवड करतात त्या शेतकऱ्यांमध्ये हा वाण विशेष लोकप्रिय आहे. या वाणाची सर्वात मोठी खासियत म्हणजे या जातीचे पीक लवकर परिपक्व होत असते.

म्हणजे पेरणीनंतर अवघ्या काही दिवसातच या जातीचे पीक काढण्यासाठी तयार होते. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पेरणीनंतर अवघ्या दोन महिन्यांनी या जातीच्या वाटाण्याचे शेंगा विक्रीसाठी तयार होतात.

याशिवाय या वाटाणाच्या शेंगामध्ये दाणेही जास्त असतात. निश्चितच अवघ्या दोन महिन्यांच्या काळात हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे.

बियाणं कुठनं ऑर्डर करणार? 

ज्या शेतकऱ्यांना या जातीचे बियाणे मागवायचे असेल ते याचे बियाणे ऑनलाइन देखील मागवू शकतात. राष्ट्रीय बियाणे महामंडळाची अधिकृत वेबसाइटवर जाऊन शेतकऱ्यांना या बियाण्याची ऑर्डर देता येणार आहे.

https://t.co/j2XYObDlgW ही राष्ट्रीय बियाणे महामंडळाची अधिकृत वेबसाईट आहे. पीबी 89 या वाणाच्या बियाण्याचे एक किलोचे पॅकेट 175 रुपयाला मिळत आहे तर आर्केल या वाणाचे पाकीट 127 रुपयाला मिळत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा