Pea Farming : वाटाणा लागवड बनवणार शेतकऱ्यांना मालामाल…! पण लागवड करताना ‘या’ गोष्टींची घ्यावी लागेल काळजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pea Farming : मित्रांनो भारतात शेतकरी बांधव (Farmer) वेगवेगळ्या पिकांची शेती (Agriculture) करत असतात. यामध्ये असे देखील काही पिके आहेत ज्याच्या लागवडीने जमिनीची सुपीकता (Soil Fertility) वाढते. वाटाणा (Pea Crop) हे देखील असंच एक पीक आहे. विशेष म्हणजे या पिकाची एका वर्षातून एकदा लागवड केली तरी जमिनीची सुपीकता वाढत असल्याचा दावा केला गेला आहे.

शिवाय या पिकाच्या शेतीतून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न (Farmer Income) देखील मिळते. अशा परिस्थितीत या पिकाची लागवड शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळवून देत आहे. अशा परिस्थितीत आज आपण वाटाणा शेतीतील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

वाटाणा शेतीमधील काही महत्वाच्या बाबी 

वाटाणा पीक हे हिवाळी पीक म्हणून सामान्यता ओळखले जाते. त्यातील हिरव्या वाटण्याचा भाजी म्हणून वापर केला जातो, तसेच वाटाणे वाळल्यानंतर कडधान्य म्हणून उपयोगात आणले जाते. मटारची किंवा वाटाण्याची लागवड प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक आणि बिहारमध्ये केली जाते.

आपल्या राज्यात देखील शेतकरी बांधव वाटाणा शेती करत असतात. विशेष म्हणजे वाटाणा मध्ये औषधी गुणधर्म आढळत असल्याने याचे सेवन आरोग्यासाठी विशेष लागू करत असून याची मागणी आता बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाटाणा लागवडीसाठी अनुकूल हवामान नेमकं कोणतं बर 

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्‍टोबर-नोव्हेंबर हे महिने मटार लागवडीसाठी सर्वात योग्य असतात आणि बियाणे वाढण्यासाठी 22°C तापमानाची आवश्यकता असते. बियाणे उगवल्यानंतर, त्याच्या चांगल्या विकासासाठी आणि शेंगामध्ये चांगले धान्य तयार होण्यासाठी तापमान 10 ते 15 सेल्सिअस दरम्यान असावे.

वाटाणा लागवडीसाठी योग्य शेतीजमीन नेमकी कोणती बर 

मित्रांनो कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मटारची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत केली जाते, परंतु वालुकामय चिकणमाती आणि चिकणमाती असलेली जमीन या पिकाच्या लागवडीसाठी अधिक योग्य असते. मात्र वाटाणा पिकातून चांगल उत्पादन घेण्यासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची संपूर्ण व्यवस्था शेतकरी बांधवांनी करायला पाहिजे. मातीचा pH 6 ते 7.5 च्या दरम्यान असल्यास या पिकापासून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असतं.

वाटाणा शेतीसाठी जमीन तयार करण्याची पद्धत नेमकी कशी असते बर…!

खरीप हंगामातील काढणीनंतर शेत तयार करण्यासाठी 1 ते 2 वेळा नांगरणी करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय शेतात पाणी साचू नये म्हणून शेतकरी बांधवांना शेत जमीन समतल करण्याचा सल्ला दिला जातो. पेरणीपूर्वी एकदा शेताला पाणी द्यावे जेणेकरून बिया सहज उगवू शकतील.

पेरणीची वेळ आणि पद्धत

मटारचे चांगले उत्पादन घेण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पेरणी पूर्ण करावी. मात्र यापलीकडे पेरणी केली तर त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर दिसून येतो. पेरणी करताना लक्षात ठेवा की बियाणे जमिनीत 2 ते 3 सेमी खोल ठेवावे. खोलीत पेरणी करा आणि बियाणे ते बियाणे अंतर 30 सेमी. x 50 सेमी  ठेवा.

किती बियाण लागत बर…!

वटाणा पेरणीसाठी एकरी 35 ते 40 किलो बियाणे वापरावे. याशिवाय, पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थिराम 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे मिसळून प्रक्रिया करावी. असे केल्याने उत्पादन क्षमता 8 ते 10 टक्क्यांनी वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

खत व्यवस्थापन 

वाटाणा लागवडीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी 20 किलो युरिया, 25 किलो स्फुरद प्रति एकर पेरणीच्या वेळी वापरावे.

तण नियंत्रण करावं लागत 

मटारच्या जातीनुसार खुरपणी करणे आवश्यक आहे. पहिली खुरपणी झाडाला 2-3 पाने आल्यानंतर केली जाते आणि दुसरी खुरपणी फुले येण्यापूर्वी केली जाते.

सिंचन व्यवस्थापन कसे करावे

वाटाणा पेरण्यापूर्वी सिंचन आवश्यक आहे. पण जर तुम्ही भातशेतीत मटार लावत असाल तर त्यात आधीच ओलावा असल्याने पेरणी सिंचनाशिवाय करता येते. याशिवाय पेरणीनंतर सिंचन केले जाते, ज्यामध्ये पहिले पाणी फुलोऱ्यापूर्वी आणि दुसरे पाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत दिले जाते.

कापणीची वेळ नेमकी केव्हा असते 

वाटाणा शेंगाची काढणी अशा वेळी करावी जेव्हा वाटाण्याचा रंग गडद हिरवा होऊ लागतो. 6 ते 10 दिवसांच्या अंतराने 4 ते 5 वेळा काढणी करता येते. याशिवाय जमिनीची सुपीक शक्ती आणि शेतातील पिकाचे व्यवस्थापन यावर पिकाचे उत्पन्न अवलंबून असते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment