Pea Farming : रब्बी हंगाम आला.. तयारीला लागा…’या’ जातीच्या वाटाण्याची शेती करा, लाखों कमवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pea Farming : राज्यात येत्या काही दिवसांत रबी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे.

येत्या काही दिवसात आता शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू करणार आहेत. रब्बी हंगामात शेतकरी बांधव (Farmer) गहू हरभरा या प्रमाणेच वाटाणा या पिकाची (Pea Crop) देखील मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, वाटाणा लागवड राज्यातील खानदेश, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात मोठ्या प्रमाणात केली जाते.  जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार वाटाणा पीक खरीप हंगामात तसेच रब्बी हंगामात उत्पादित केले जाऊ शकते.

येत्या काही दिवसात राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात होणार असल्याने आज आपण वाटाणा पिकाच्या काही सुधारित जाती (Pea Variety) जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

वाटाणा पिकाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे :-

अरकेल वाटाण्याची एक सुधारित जात : जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार वाटाणा पिकाच्या या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असतात. वाटण्याच्या शेंगा साधारणपणे 6 ते 7 सेंमी. लांबीच्या असतात.

याशिवाय या जातीच्या वाटाणा पिकाची उंची 35 ते 45 सेंमी. एवढी असते. शेतकरी बांधवांनी या जातीच्या पिकाची लागवड केल्यास लागवड केल्याच्या दिवसापासून 50 ते 55 दिवसांनी वाटाणा पिकापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते.

बोनव्हेला : जाणकार लोकांच्या मते वाटाण्याची ही एक सुधारित जात आहे. या जातीची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असतात. या जातीच्या शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात.

या जातीच्या झाडांची उंची मध्यम असते. या जातीच्या वाटाण्याची लागवड केल्यानंतर साधारण 45 दिवसांनी शेतकरी बांधवांना उत्पादन मिळण्यास सुरवात होते. निश्चितच ही एक अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होणारी वाटाणा जात आहे.

जवाहर -1 : हीदेखील वाटाण्याची एक सुधारित जात म्हणून ओळखली जाते. या जातीची लागवड संपूर्ण भारतवर्षात पाहायला मिळते. या जातीच्या शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असतात. या जातीच्या शेंगा सर्वसाधारणपणे 6 सेंमी. पर्यंत. लांब असतात.

लागवडीपासून 55 दिवसांत फुलावर येते व 90 दिवसांत या जातीपासून शेतकरी बांधवांना उत्पादन मिळण्यास सुरवात होते. आपल्या महाराष्ट्रात देखील या जातीची लागवड पाहायला मिळते. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment