मार्च महिना उजाडला असून शेतातील कामांना देखील वेग आला आहे. रब्बी हंगामातील पिके सध्या अंतिम टप्प्यात आली आसून. मार्च महिन्यात जर शेतकर्यांनी योग्य पपई लागवड केली त्याचे पूर्व नियोजन केले. तर शेतकऱ्याला योग्य वेळ आणि लागवडीत भरघोस उत्पादन घेता येणार आहे.
मार्च महिन्यातील वातावरण हे पपई लागवडीसाठी अनुकूल मानले जाते. ह्या महिन्यात पपई लागवडीचे योग्य ते नियोजन आणि कृषीतज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊन लागवड करणे महत्त्वाचे आहे.
तर कोणत्या कृषी सल्लाच्या आधारे आपण पपई लागवड केली पाहिजे ते जाणून घेऊ.
पपई पिकासाठी पूर्वनियोजन :-
शेतकऱ्यांनी पपई लागवड करत असताना पिकाचे पूर्व नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत भरघोस उत्पादन मिळणार आहे. त्यासाठी लागवडीपूर्वी रोपांचे प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे.
मार्च – एप्रिल महिन्यात भारतातील बहुतांश भागात पपईची रोपे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नर्सरीत तयार होऊ शकत नाहीत.
कारण त्यावेळी रात्रीचे तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत असते , त्या तापमानात पपईच्या बिया रुजत नाहीत. आणि लागवडी वेळी प्रत्यारोपण केले असतात.
बीजारोपण लांबणीवर पडते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच नर्सरीध्ये प्रत्यारोपण केल्यास योग्य वेळेत लागवड करता येते.
पाॅली हाऊस :-
पॉलिहाऊसमध्ये पपईचे पीक अधिक चांगले येते.
तर अल्पभूधारक शेतकरी साधे शेड तयार करून देखील उत्पादन घेऊ शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबूचे लाकूड व लोखंडी रॉड चा वापर करता येणार आहे.
प्रथम चौकोनी पलंगा सारखे शेड तयार करून घ्यावे लागणार आहे. नंतर पांढऱ्या पारदर्शक पॉलिथिलीन शीट घेऊन 20 ते 30 मायक्रॉन जाड घेवुन दोन मीटर रुंद या माध्यमातून एक मीटर रुंद 15 सेंटिमीटर उंच पलंग आवश्यकतेनुसार तयार करून घ्यावे रांगेमध्ये पपई बीजारोपण 2 सेंटीमीटर ओळीत करून घ्यावे.
संकरीत बियाणे निवड :-
पपईचा एक हेक्टर शेतामध्ये लागवड करण्यासाठी साधारणतः 250 ते 300 ग्रॅम बिया लागतात.
वेगवेगळ्या वाणानुसार त्याचे प्रमाण देखील वेगवेगळे आहे. एफ 1 लाल स्त्री या वाणाच्या बियाची नर्सरी लागवड केली असता 60 ते 70 ग्रॅम बियाणांची गरज लागते तर रेडी लेडी 100 ग्रॅम चार पॅकेटमध्ये सुमारे 600 बिया असतात.
तर हेक्टरी शेतात 1.8 मीटर× 1.8 मीटर अंतरावर पपईची लागवड 3200 रुपये लागतात.
माती व खत निवड :-
पपई बियांची लागवड करण्यासाठी तांबडी माती व 10 दिवस आगोदरच कंपोस्ट खताची गरज लागते. 75 ग्रॅम एनपीके , 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा व वर्मी कंपोस्ट तयार केलेल्या बेडमध्ये मिसळावे.
नंतर बेड समतल करून घेऊन बीजारोपण करावे. बीजारोपण केलेली जागा पालापाचोळा किंवा कुजलेल्या खताने झाकून टाकावी. गरजेनुसार बियांवर पाणी फवारणी केली पाहिजे.
रोग नियंत्रण :-
उगवण झालेल्या रोपांना आद्र रोगाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिडोमिल एम गोल्ड नावाचे औषध 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी.
त्यामुळे रोगाचा विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.
ह्या पद्धतीने बीजारोपण केले असता. कमी खर्चात काही बांबूच्या लाकडांच्या व लोखंडी सळईनच्या साह्याने बाहेरील वातावरणापेक्षा पॉलिहाऊस मधील तापमान हे 5 ते 7अंश सेल्सिअसने कमी असते.
त्यामुळे बिया उगवणे सुलभ जाते. उगवलेली रोपे 5 ते 6 आठवड्या नंतर लागवडीसाठी तयार होतात. या तंत्राने पपईचे बीजारोपण केले असता कमी वेळेत रोप विक्री करून जास्तीत जास्त नफा मिळवता येतो.