गव्हाच्या कोणत्या जातींची पेरणी केली पाहिजे ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : पंजाबराव डख हे नाव राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कायमच चर्चेत राहते. डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. यासोबतच पंजाबराव शेतकऱ्यांसाठी नेहमीच शेती बाबत महत्त्वाची माहिती देखील देत असतात.

ते विविध ठिकाणी जाऊन शेतकरी मेळाव्यात सहभाग नोंदवतात आणि शेतकऱ्यांना हवामानाच्या बदलानुसार कशी शेती केली पाहिजे याविषयी माहिती देत असतात. दरम्यान, डख यांनी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वीच यंदा शेतकऱ्यांनी कोणत्या गव्हाच्या वाणाची पेरणी केली पाहिजे ? याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कोणत्या गव्हाच्या वाणाची पेरणी कराल ?

खरंतर, सध्या संपूर्ण देशात खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग प्रगतीपथावर आहे. खरिपातील सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांची हार्वेस्टिंग सध्या जोरात सुरू आहे. एकंदरीत खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून आगामी काही दिवसात रब्बीला सुरुवात होणार आहे.

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या मशागतीची कामे देखील सध्या शेत शिवारात युद्ध पातळीवर सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान या रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना गव्हाच्या पिकातून एकरी 25 क्विंटल पर्यंतचा उतारा मिळवण्यासाठी गव्हाच्या सुधारित वाणांची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.

त्यांनी सांगितलंय की, शेतकरी बांधवांनी म्हायको 7070, श्रीराम 111, अजित आणि रुची या सारख्या गव्हाच्या वाणाची पेरणी केली पाहिजे. यासोबतच त्यांनी गहू पेरणी करताना शेतकरी बांधवांनी किमान 40 किलो प्रति क्विंटल एवढे बियाणे वापरून गव्हाची पेरणी केली पाहिजे असे सांगितले आहे. यासोबतच गहू पेरणी करताना एकरी दोन बॅग DAP वापरण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.