Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याने काल-परवा एक मोठी अपडेट दिली आहे. हवामान खात्याने आता ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात कुठेच पाऊस बरसणार नाही असे स्पष्ट केले आहे. हवामान खात्याच्या या नवीन अंदाजानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे. वास्तविक, या कालावधीत नेहमीच अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते.
हिवाळ्यात नेहमीच अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कालावधीत बरसणारा अवकाळी पाऊस हा रब्बी हंगामातील पिकांना अनेकदा नुकसानदायक ठरला आहे. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. यावर्षी पावसाळी काळात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाणे, यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पाऊस झाला आहे.
जरी हे प्रमाण कमी भासत असलं तरी देखील पावसाचे असमान वितरण पाहता ही टक्केवारी शेतकऱ्यांसाठी खूपच घातक ठरली आहे. शिवाय, यंदा परतीचा पाऊस देखील खूपच कमी प्रमाणात बरसला आहे. यामुळे आता अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस पडला पाहिजे असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तरी चालेल मात्र गुराढोरांचा चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निकाली निघेल असे शेतकरी सांगत आहेत.
विशेष म्हणजे काही भागात खूपच कमी पाऊस पडला आहे म्हणून त्या संबंधित भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. हेच कारण आहे की आता अवकाळी पावसासाठी देखील देव नवसला जात आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रातील नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहील असे सांगितले आहे.
मात्र तदनंतर वातावरणात मोठा चेंज येण्याची शक्यता आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडेल असे त्यांनी सांगितले आहे. नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात यावर्षी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज त्यांनी नुकताच वर्तवला आहे. याशिवाय, यंदा डिसेंबर महिन्यात देखील चांगला पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सोबतच त्यांनी 26 ऑक्टोबर पासून म्हणजेच उद्यापासून राज्यात थंडीचा जोर वाढेल अशी महत्त्वाची माहिती देखील यावेळी दिली आहे. यामुळे आता पंजाबराव यांच्या म्हणण्याप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पाऊस पडतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.