Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने मोठा बदल बघायला मिळतं आहे. राज्यातील काही भागात उष्णतेचे सावट आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि वादळी पाऊस सुरू आहे.
वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हळद आणि कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वादळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला असल्याचे सांगितले आहे. खरे तर पंजाब रावांनी याआधी महाराष्ट्रात सात में ते 11 मे दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला होता.
आता मात्र पंजाब रावांनी एक नवीन सुधारित अंदाज जारी केला असून यामध्ये पंजाबरावांनी पावसाचा मुक्काम 14 मे पर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. अर्थातच महाराष्ट्रात 14 मे पर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजात महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच कोणत्या भागात गारपीटीची शक्यता वर्तवली आहे या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 11 मे पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मात्र तदनंतर पावसाचे प्रमाण वाढत जाणार आहे. 11 मे ते 14 मे दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत विजा आणि वारे देखील पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद, कांदा इत्यादी शेतीमाल झाकून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त राहणार असल्याने शेतकऱ्यांनी झाडाखाली जनावरे बांधून नयेत असे देखील पंजाब रावांनी म्हटले आहे.
राज्यातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर या भागात 11 मे पर्यंत पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. यानंतर मात्र राज्यात सर्व दूर पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर आणि यवतमाळ मध्ये गारपीट होणार असे देखील म्हटले गेले आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेतीमालाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतीय हवामान खात्याने देखील शनिवारपर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा अंदाज दिला आहे.