पंजाबरावांचा डिसेंबर 2023 चा हवामान अंदाज आला ; कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान, अवकाळी पाऊस केव्हा-केव्हा पडणार ? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News : गेल्या आठ दिवसांपासून राज्यासह देशभरातील विविध राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र गेल्या महिन्यात सुरू झालेला हा अवकाळी पाऊस मोठा हाहाकार माजवत आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक भुईसपाट झाले आहे. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

यामुळे राज्यातील शेतकरी बांधव पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबरावं डख यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आता 2 डिसेंबर पासून हवामान कोरडे राहणार आहे. दोन डिसेंबर पासून राज्यात सूर्यदर्शनला सुरुवात होणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे राज्यात आता मोठा पाऊस पडणार नाही.

जवळपास 2 डिसेंबर पासून ते 5 डिसेंबर पर्यंत राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज त्यांनी वर्तवला असून आज पासून राज्यात सूर्य देवाचे दर्शन होणार आहे.

मात्र असे असले तरी सहा तारखे नंतर पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. सहा ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यातील हवामान अंशतः ढगाळ राहील आणि या कालावधीत काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे.

या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही, फक्त रिमझिम पाऊस पडेल यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये असे पंजाबरावांनी सांगितले आहे.

डख यांनी म्हटल्याप्रमाणे, राज्यातील लातूर, नांदेड, उदगीर, धर्माबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती या भागांमध्ये या कालावधीत रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल.

मात्र, राज्यात आता आगामी काही दिवस मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

एकंदरीत, आज पासून राज्यातील हवामान कोरडे होईल असा अंदाज असल्याने अवकाळी पावसामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना या निमित्ताने दिलासा मिळणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा