Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सूनचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला आहे. खरंतर गेल्या एका आठवड्यापासून मान्सूनचा प्रवास थांबला होता. मान्सून एकाच ठिकाणी खोळंबला असल्याचे पाहायला मिळाले होते. यामुळे राज्यात पावसाचा जोर हा कमी झाला होता. आता मात्र मान्सून पुढे सरकला आहे.
एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर मान्सून पुढे सरकला असल्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या शिवाय आज मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि कोकणातील जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट देखील जारी केला आहे.
दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 22 जून पर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत भाग बदलत पावसाची शक्यता आहे.
परंतु परवापासून अर्थातच 23 जून पासून ही परिस्थिती बदलणार आहे. 23 जून ते 25 जून दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी पण चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच या कालावधीतही राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही.
पण जिथे पाऊस पडेल तिथे जोरदार पाऊस पडेल असे पंजाबरावांनी म्हटले आहे. 26 जून पासून मात्र राज्यात सर्व दूर पावसाला सुरुवात होणार आहे. 26 जून ते 30 जून दरम्यान राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
विशेष बाब अशी की या पाच दिवसांच्या काळात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये नदी नाले भरून वाहणार आहेत. अनेक ठिकाणी छोटे-मोठे पाण्याचे तळे देखील भरले जातील अशी आशा आहे.
निश्चितच जूनच्या अखेरीस चांगला पाऊस झाला तर याचा खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय पंजाब रावांनी जुलै महिन्यात दहा ते पंधरा जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच 19 आणि 20 जुलै रोजी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. जुलैच्या अखेरीस म्हणजेच 25 ते 26 जुलै दरम्यान देखील राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.