महाराष्ट्रात आणखी किती दिवस पडणार पाऊस ? अवकाळी पाऊस पडण्याची नेमके कारण काय ? पंजाब डख यांनी स्पष्टचं सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. शनिवारपासून सुरू झालेला हा पाऊस राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी मोठा घातक ठरत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषता 26 तारखेला राज्यातील काही भागात झालेल्या तुफान गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान होणार आहे.

यामुळे आता महाराष्ट्रात आणखी किती दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार आणि अवकाळी पाऊस पडण्याचे नेमके कारण काय आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दरम्यान याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी.

पंजाब रावांनी राज्यात दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असे मत व्यक्त केले आहे. आता आपण राज्यातील कोणकोणत्या भागात हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार याबाबत पंजाबराव यांनी काय माहिती दिली आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

काय म्हटले पंजाबराव ?

पंजाब डख यांनी एबीपी माझा या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील पूर्व आणि पश्चिम भागात एक डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार आहे.

या कालावधीत पडणारा हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा राहणार असून यामुळे ओढे नाले भरून वाहतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील एक डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपूर्वी गारपीट झाली होती. आता मात्र उत्तर महाराष्ट्रात गारपीट होणार नाही. या कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्रात फक्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही आवाहन पंजाबराव यांनी केले आहे.

याशिवाय मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात दोन डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. पण या कालावधीमध्ये मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. त्यामुळे तेथील शेती पिकांचे देखील आता नुकसान होणार नाही. 

नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याचे कारण काय?

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पृथ्वीचं तापमान हे वाढत आहे. म्हणजेच सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा अनुभव येत आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या हवामानात मोठा बदल होत आहे. याचं तापमान वाढीमुळे सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होत आहे.

तर याचाच परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गारपीट अनुभवायला मिळाली होती. विशेष म्हणजे भविष्यात देखील अशीच परिस्थिती कायम राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. सध्या हवेचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल आहे. हेच कारण आहे की आता राज्यात दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा