पंजाबरावांचा जानेवारी 2024 साठीचा नवीन हवामान अंदाज, ‘या’ तारखेला पडणार अवकाळी पाऊस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : सध्या राज्यातील विविध भागांमध्ये तुर पिकाची हार्वेस्टिंग सुरू आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात तुर हार्वेस्टिंग ला वेग आला आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात कांद्याची काढणी सुरू आहे.

एवढेच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कापूस वेचणी देखील सुरू आहे.मराठवाडा आणि विदर्भात देखील कापूस वेचणीचे कामे सुरू आहेत. याशिवाय रब्बी हंगामातील पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत.

अशातच मात्र राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी जानेवारी 2024 मध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातील काढण्यासाठी आलेल्या शेती पिकांचे आणि रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात बरसणार मुसळधार पाऊस

ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच अवकाळी पाऊस बरसणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील बहुतांशी भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा महत्त्वाचा अंदाज पंजाबराव डख यांच्या माध्यमातून समोर आला आहे.

परिणामी, राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

खरे तर अवकाळी पाऊस हा वादळी स्वरूपाचा असतो यामुळे या कालावधीत पशुधनाची आणि शेती पिकांची विशेष काळजी घेणे अपरिहार्य आहे.तथापि पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

खरे तर सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने तेथून महाराष्ट्राच्या दिशेने जोरदार वारे वाहत आहेत याचा परिणाम म्हणून राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार थंडी पडत आहे.

पण डख यांनी पुढल्या महिन्यात अर्धाच जानेवारी 2024 मध्ये पहिल्या आठवड्यातच अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा